GunratnaSadvarteNewsUpdate : कोल्हापुरातही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर : शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील हल्ला बोल प्रकरणात अटकेत असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सातारा येथे छत्रपतींसाठी अवमानकारक भाषेचा वापर केल्यामुळे गुन्हा दाखल असताना आता मराठा आरक्षण प्रश्नावर टीका करताना मराठा आणि मागास जातीबाबत चुकीचे वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणातही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मराठा समाज समन्वय समितीचे कार्यकर्ते दिलीप मधुकर पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सदावर्ते यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावरील हल्ला प्रकरणातील पोलिस कोठडी संपल्यानंतर सातारा पोलिसांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक केली असून कोर्टाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी आहे. दरम्यान कोल्हापूरातही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. सातारा येथील गुन्ह्यात त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर कोल्हापूर पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेण्याची शक्यता आहे .त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. याशिवाय अकोला येथेही त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात एका एसटी कर्मचाऱ्याला अकोला पोलिसांनी शुक्रवारी औरंगाबाद येथून अटक केली आहे. या प्रकरणात अकोला पोलिसही साद्वार्ते यांना करू शकतात.