PuneNewsUpdate : भोंग्याच्या राजकारणामध्ये देवाला अडकवून नका, श्रीपाल सबनीस यांचे आवाहन

पुणे : “भोंग्याच्या आवाजापेक्षा संविधांनाचा आवाज मला पवित्र वाटतो. भोंग्याच्या राजकारणामध्ये देवाला अडकवून नका आणि धर्माला बदनाम करु नका. संविधानाची वाटणी आणि फाळणी करु नका. हे आपल्या देशाला परवडणारे नाही,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मनसेने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली आहे.
पुण्यातील साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराच्या विश्वासातामार्फत हनुमान जंयतीच्या पूर्वसंध्येला रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती,गणपतीची मूर्ती, हनुमानाची मूर्ती आणि त्याच्या आतील बाजूस पीर दर्गा आहे.या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील नागरिक सहभागी झाले. या कार्यक्रमाला साहित्यिक श्रीपाल सबनीस उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिम समुदायाकडून रोजा सोडण्यात आला.
“असे एकात्मतेचे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. गेल्या ३५ वर्षापासून ही परंपरा चालू आहे. भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी याचा आदर्श घ्यावा. अशा प्रकारचे प्रयोग राजकीय स्तरावर करावेत. यामुळे राजकारण, धर्मकारण शुद्ध होईल आणि तिरंगा आनंदाने फडकेल,” असे श्रीपाल सबनीस यांनी म्हटले.