AurangabadCrimeUpdate : अल्पवयीन प्रेमीयुगल, लग्नासाठी गावाकडे, प्रियकर बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : घरातून लग्नासाठी पळून गेलेल्या शांतीनगर परिसरातील अल्पवयीन प्रियकर प्रेयसीला पुंडलिकनगर पोलिसांनी बदनापुर जवळील दाभाडी परिसरातून ताब्यात घेत पोक्सो सहित बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला ताब्यात घेतल्याचे पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी सांगितले.
गेल्या वर्ष भरापासून शांतीनगर परिसरात बदनापूर जवळील दाभाडीचे लहानपणीचे मित्र असलेले दोघे जण लग्न करण्यासाठी शुक्रवारी रात्री १ वा. प्रियकराच्या शहरातील घरी पोहोचले. प्रियकराच्या आई वडलांनी दोन्ही मुलांची समजूत काढून मुलीला तिच्या आई वडलांकडे सोडून येण्यास मुलाला सांगितले.पण तसे न करता अल्पवयीन जोडपे गावाकडे येऊन लग्न करंत असल्याची माहिती पिडीत मुलीच्या आई वडलांना कळली.अल्पवयीन जोडपे एकाच गावचे असल्यामुळे त्यांचा त्वरीत ठावठिकाणा लागला.
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांना मुलीच्या नातेवाईकांनी माहिती दिल्यावर पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दाभाडीहून अल्पवयीन जोडीला पोलिस ठाण्यात आणले. पिडीत मुलीचे पालकही पोलिस ठाण्यात आल्यानंतर महिला दक्षता समितीच्या सदस्यासमोर मुलीचा जबाब नोंदवला. पिडीत मुलीच्या आई वडलांच्या उपस्थितीत पिडीतेने बलात्कार झाल्याची फिर्याद देताच अल्पवयीन प्रियकरावर गुन्हा दाखल झाला.पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकमगर पोलिस करंत आहेत.