Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : What an idea … !! गरीब आणि कुपोषित मुलांसाठी मोदींची छबी असलेले खास भाजप चॉकलेट !!

Spread the love

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो आणि भाजपचे निवडणूक चिन्ह जमेल तिथे वापरायचे आणि पक्षाचा प्रचार करायचा असेच जणू भाजपने ठरवले आहे. अगदी कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो वापरण्याचे कसब मोदींनी दाखवले आहे. न्ययालयात हे प्रकरण जाऊनही न्यायालयाने त्याला कोणतीही आडकाठी दाखवली नाही. आता गुजरातमधून आलेल्या वृत्तानुसार भाजपने गरीब आणि कुपोषित मुलांसाठी तयार केलेल्या चॉकलेटच्या रॅपरवरही मोदींची छबी छापली आहे.

गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि , “आमच्या निरंजनभाईंनी कुपोषित मुलांसाठी तयार केलेल्या चॉकलेटचे नमुने मंगळवारी संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी खासदारांना देण्यात आले,” या चॉकलेटच्या रॅपरवर भारतीय जनता पार्टीचे नावही प्रिन्ट करण्यात आले असून कमळाच्या चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही यावर छापण्यात आला आहे.

विशेष म्हणजे भाजप संसदीय पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी भाजपच्या सर्व मंत्री आणि खासदारांना या निमित्ताने तयार केलेली खास टोपीही देण्यात आली. चार राज्यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधील रोड शोमध्ये हि टोपी घातली होती. या टोपीसोबतच भाजपच्या खासदारांबरोबरच सुमारे ४०० नेत्यांना एनर्जी बूस्टर चॉकलेटचे वाटपही करण्यात आले. दिल्ली भाजपनेही हि खास टोपी आणि एनर्जी बूस्टर चॉकलेट्सची ऑर्डर दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भगव्या टोपीचे खास वैशिष्ट्य

भाजपची ही नवीन कॅप आधीच्या कॅपपेक्षा वेगळी आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याची रचना उत्तराखंडच्या टोपी आणि ब्रह्मकमळमधून घेण्यात आली आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात परिधान केली होती. हे आकर्षक आणि फॅशनेबल पद्धतीने डिझाइन केले आहे जेणेकरून तरुणांनाही ते आवडेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!