AurangabadNewsUpdate : ट्रक चालकाने रागाच्या भरात केला दुसर्या पत्नीचा खून, पहिल्या बायकोच्या घरातून अटक

औरंगाबाद – घरातील कटकटीला वैतागून दुसर्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणार्या ट्रक चालकाला जिन्सी पोलिसांनी पहिल्या पत्नीच्या घरातून ताब्यात घेत अटक केली. शेख खलील शेख इस्माईल(४०)रा.बायजीपुरा गल्ली नं २१ असे अटक ट्रक ड्रायव्हरचे नाव आहे. तर अंजुम खलील शेख(३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.यापूर्वीही मुकुंदवाडी भागात राहात असतांना शेख खलील ने मयत अंजूम ला बेदम मारहाण केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , काल सकाळी ९.३०च्या सुमारास अंजूम व खलील चे कडाक्याचे भांडण झाले.रागाच्या भरात खलीलने अंजूमला घराबाहेरुन दगड आणंत डोक्याला गंभीर जखम केली.हा प्रकार पाहुन मुले मोठ्याने ओरडत असल्यामुळे शेजारी धावून आले तो पर्यंत खलील पसार झाला होता.शेजार्यांनी अंजूमला खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी घाटी रुग्णालयात अंजूम ला नेण्याचा सल्ला दिला.रात्री ९.३० वा.अंजूम मृत्यू पावली.घाटी रुग्णालयातून एम.एल.सी.नुसार जिन्सी पोलिसांना १० वा. मिळाल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला.
हि माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ , पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे,एपीआय गोकुळ ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला. दरम्यान आरोपी पहिल्या पत्नीच्या घरात गारज ता,वैजापूर येथे लपून बसल्याची माहिती मिळताच एपीआय ठाकूर, पोलिस कर्मचारी नंदलाल चव्हाण यांच्यासह पथकाने गारज ला जाऊन आरोपी खलील ला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मयेकर करंत आहेत.