AurangabadCrimeUpdate : जुन्या भांडणातून शिवीगाळ, मारहाणीत तरुणाचा मृत्यू ,वडिलांसह तिन्ही मुले अटक

औरंगाबाद – वडलांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला जाब विचारतांना केलेल्या मारहाणीत तिन्ही मुलांकडून खून झाल्यामुळे सीड को पोलसांनी चौघांना अटक केली आहे.काल रात्री ९ वा संघर्ष नगरात वरील घटना घडली. अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी दिली.
सलीम मुस्तफा शहा असे मयताचे नाव असून प्रभुदास पारधे, व सुनील, मनोज आणि सागर पारधे अशी अटक आरोपीची नावे आहेत दोन्ही कुटुंब एकाच गल्लीत राहतात मयत सलीम आणि पारधे कुटुंबाच्या नेहमी सतत करबुरी होत होत्या पारधे कुटुंब हे वे ल्डीन्ग चा व्यवसाय करते. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास मयताने प्रभुदास पारधे यांना शिवीगाळ केली हा प्रकार त्यांच्या मुलाने सुनील ने पाहताच सुनील ला राग आला याचा जाब विचारतांना सुनील आणि त्याच्या भावांनी सलीम ला मारहाण केली.त्यात सलीम बेशुद्ध झाला त्यामुळे बेशुद्ध पडलेल्या सलीमला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्तरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रद्धा वायद्नडे पुढील तपास करताहेत