Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : कार्यालयातच जुगार मांडणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हे शाखेने ठोकला गुन्हा … !!

Spread the love

औरंगाबाद :  पोलिस आयुक्तालयाशेजारील खोलीत जुगार खेळंत असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने तत्परतेने धाड टाकून १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करंत पोलिस अंनलदारासह ९ जणांविरुध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुरेश भिकाजी इंगळे असे जुगार खेळतांना आढळलेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्माक कारवाई होईल असे पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी सांगितले.

सुरेश इंगळे हे अनुभवी पोलिस कर्मचारी म्हणून पोलिस मुख्यालयात ओळखले जातात. कारवाई करण्याकरता अनेक सहकारी त्यांच्याशी बारकावे समजून घेत असतात. अशी ख्याती असतांना ते जुगार खेळतांना आढळल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी खेद व्यक्त केला. त्यांच्यासोबत आनंद भिंडा, आकाश बनसोडे,शेख कुदरत शेख सिद्दीकी,शेख शाहरुख शेख युसुफ,अजिमोद्दीन खान,मोह्हमद मुनाफ सुलेमान,सागर जाधव,सुरेश खरात अशी इतर आरोपींची नावे आहेत. वरील कारवाई गुन्हेशाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके, आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!