Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RucciaUkraineWarUpdate : जाणून घ्या ….रशिया -युक्रेन युद्धातील महत्वाच्या घडामोडी

Spread the love

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाविषयक घडामोडींची सविस्तर माहिती अशी आहे.

सर्वप्रथम रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजण्याच्या आधी टीव्हीवर युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली. पूर्व युक्रेनमधील फुटीरतावाद्यांना संरक्षण देण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे पुतीन यांनी सांगितले. युक्रेनमधील नरसंहाराविरुद्ध हि लढाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

व्लादिमीर पुतिन यांच्या या घोषणेनंतर युक्रेनची राजधानी कीव आणि अनेक शहरे सूर्य उगवण्यापूर्वी स्फोटांनी दुमदुमली.  विशेष करून युक्रेनच्या किनारपट्टीवर आणि सीमेजवळ हे स्फोट सुरू झाले. 

दरम्यान युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी पुतीन यांच्यावर “सर्व शक्तीने युक्रेनवर हल्ला” केल्याचा आरोप केला. हे हल्ले सुरु झाल्यानंतर युक्रेनच्या सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे की,  रशियन सैन्य दलाने अनेक दिशांनी युक्रेनची सीमा ओलांडली आणि युक्रेनमध्ये प्रवेश केला.

या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आणीबाणीचा लष्करी कायदा लागू केला आणि नंतर रशियाशी राजनैतिक संबंध तोडल्याची घोषणा करीत युक्रेनच्या लष्करी अध्यक्षांनी सांगितले की, त्यांना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडून रशियन घुसखोरी थांबवण्याचे आणि “रशियाला जास्तीत जास्त नुकसानीची शिक्षा” करण्याचे आदेश मिळाले आहेत.

युक्रेनचा लष्करी तळ आणि त्याची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट

या बाबत रशियन संरक्षण मंत्र्यांनी  दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनचा लष्करी तळ आणि त्याची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट झाली आहे. युक्रेनने पुढे म्हटले आहे कि ,   युक्रेनवर कब्जा करण्यासाठी आलेल्या युक्रेनने केलेल्या प्रतिहल्ल्यात रशियाचे  ५० सैनिक मारले गेले तर युक्रेनचे ४० सैनिक मारले गेले. रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतलेल्या सीमेवर असलेल्या गावावर हल्ला रोखताना युक्रेनियन लष्करी कारवाईत हे जवान मृत्युमुखी पडले.

या युद्धात बेलारूसचे नेते अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी युक्रेनवरील हल्ल्यात आपले सैन्य सहभागी होत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे  बेलारूस सीमेवरून रशियन सैन्यही युक्रेनमध्ये प्रवेश करीत असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.

दरम्यान युक्रेनवरील हल्ल्याची गंभीर दखल घेत  “जग रशियाची जबाबदारी निश्चित करेल” असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी दिला आहे. बायडेनने इशारा दिला आहे कि , अर्थात यामध्ये अनेक जीव जातील. तसेच या पार्श्वभूमीवर पोलंडने ‘नाटो’ला कलम ४नुसार सक्रिय होण्यास  सांगितले आहे, या कलमानुसार नाटोच्या  एखाद्या सदस्याला धोका असल्यास आपत्कालीन सल्लामसलत केली जाते.

तेलांच्या किमतीत मोठी वाढ

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती वाढल्या  असून सात वर्षांत प्रथमच तेलाच्या किमती १०० डॉलर्सच्या पुढे गेल्या आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गच्या स्टॉक एक्स्चेंजकडून माहिती देण्यात आली आहे की, त्यांनी या देशांशी संबंधित आपले व्यापार तूर्त स्थगित केले आहेत.  या पार्श्वभूमीवर रशियाने रशिया आणि युक्रेन दरम्यान असलेल्या अझोव्ह समुद्रात वाहतूक बंद केली आहे.

चीनचा सावध पवित्रा

दरम्यान चीनने सावध पवित्रा घेत सर्व बाजूंना संयम बाळगण्यास असून ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील युक्रेनचे राजदूत सर्गेई किस्लियंट यांनी  अत्यंत भावूक होताना रशियन आघाडीला म्हटले आहे कि  , या युद्धात  सहभागी होणारे थेट नरकात जातील.

युक्रेनने नागरी प्रवासासाठी आपले हवाई मार्ग बंद केले आहेत. हा निर्णय “सुरक्षेच्या वाढत्या जोखमीमुळे” घेण्यात आला आहे.  त्याच बरोबर सुरक्षेचा उपाय म्हणून दक्षिण रशियातील शहरांमधील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!