Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : महाराष्ट्रीयन नागरिकांना आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली…

Spread the love

मुंबई  :  युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे युक्रेनमधील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यावरून जगभर चिंता व्यक्त केली जात असून युक्रेनमध्ये भारतातील २० हजार नागरिक अडकले आहेत. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्याही सुखरूप सुटकेसाठी राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या असून  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत.


याबाबत ट्विटरवरून माहिती देण्यात आली असून त्यात म्हटले आहे कि , “युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरुप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत”.

भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारताने  प्रयत्न सुरू केले होते. मंगळवारी एअर इंडियाच एक विमान २५० हून अधिक जणांना घेऊन दिल्ली विमानतळावर दाखल झाले  होते . तसेच आज सकाळी देखील एक विमान युक्रेनची राजधानी कीव येथून दिल्ली विमानतळावर दाखल झाले. पण रशियाकडून आज युद्धाची घोषणा करण्यात आल्यानंतर युक्रेनकडून हवाई क्षेत्रात प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. रशियाकडून सातत्याने  लढाऊ विमानांच्या घिरट्या युक्रेनवर सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी बॉम्बहल्ले देखील केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय नागरिकांच्या सुटकेच्या मोहिमेलाही ब्रेक लागला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!