AurangabadCrimeUpdate : १० हजाराची लाच घेताना फौजदार एसीबीच्या जाळ्यात…

औरंगाबाद – दौलताबाद पोलिस ठाण्याचा पीएसआय रवी कदम याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रु.ची लाच पंचासमक्ष घेतांना अटक केली. फिर्यादी च्या मयत वडलांचे अपघाताच्या गुन्ह्यातील मोटार प्राधिकरणाकडे दाखल करण्यासाठी लागणारा पंचनामा व गुन्ह्याचे कागदपत्रे घेण्यासाठी आरोपी पीएसआय रवी कदम याने १०हजाराची लाच मागितली म्हणून फिर्यादीने पोलिस निरीक्षक आडे यांना एकदा भेटू द्या अशी कळकळीची विनंती केली पण आरोपीने मॅडम बिझी असतात त्यांना त्रास देऊ नका अशी तंबी दिली. त्यामुळे चिडलेल्या फिर्यादीने एसीबीकडे तक्रार केल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.