AurangabadCrimeUpdate : मजुराच्या खुनाचा उलगडा,जेसीबी चालक अटकेत

औरंगाबाद- दारू पिण्याच्या कारणावरून जेसीबी चालकाने मजुराच्या डोक्यात दगड टाकून खून केल्या प्रकरणी सिडको पोलिसांनी तब्ब्ल तीन आठ्वड्यानन्तर खुनी १३ फेब्रुवारी रोजी जेरबंद केला. त्याला कोर्टाने १८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी दिली.
आयाजखान बशीर खान (३६) रा. रहेमानिया कॉलनी असे अटक आरोपीचे नाव आहे.तो जेसीबी चालक असून दारू पिण्याच्या सवयीचा आहे अशी माहिती पोलिसांनी दिली तीन आठवड्यापूर्वी मयत सिद्धार्थ भगवान साळवे (३६)रा. हडको याने आरोपी आयाजखां ला शिवीगाळ केली होती,म्हणून याचा २० जा ने वारी २२ रोजी मध्यरात्री हडकोतील व्यापारी संकुलाच्या गाळ्यात आरोपीने दारूच्या नशेत सिद्धार्थच्या डोक्यात दगड घातला त्यापूर्वी मयताला लाकडी दांड्याने मारहाण केली सिद्धार्थचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न आरोपीने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले .
वरील कारवाई पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी पवार विनोद सल्गरकर , पीएसआय अशोक अवचार ,पोलीस कर्मचारी विजयानंद गवळी विशाल सोनवणे, इरफानखान यांनी पार पाडली