Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : पर्यावरण व वातावरणीय बदलासाठी सकारात्मक कार्याची आणि कृतीची गरज : डॉ. संगीता तोडमल

Spread the love

अमेरिकेतआपल्या परसबागेत सुमारे 50 हून अधिक वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या फुलविणाऱ्या डॉ.संगीता तोडमल


मुंबई : नुकताच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पर्यावरण व वातावरणीय बदल या विषयावर ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी शहर आणि गावाच्या पातळीवर झटून काम करणाऱ्या ग्रीन टीमच्या सदस्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन वसुंधरेचं सौंदर्य खुलविण्यासाठी हा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता .


या कार्यक्रमात विविध प्रकारच्या पर्यावरण संदर्भातील क्षेत्रात करिअर करून ज्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे अश्या व्यक्तीला सहभागी करण्यात आले होते आणि या माध्यमातून त्याचे कार्य जाणून घेण्यात आले. या कार्यक्रमात अमेरिकेतील पर्यावरण अभ्यासक डॉ. संगीता तोडमल यांचाही सहभाग होता. हा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह तसेचयू ट्यूब लाईव्ह पद्धतीने सुद्धा दाखवण्यात आला. एकूणच संपूर्ण वसुंधरा वाचली पाहिजे या विषयावरील जागृतीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पृथ्वी ला वाचवण्यासाठी कार्य

या कार्यक्रमात उत्तरा मोने यांनी डॉ. संगीता तोडमल यांची मुलाखत घेतली आणि त्याचे पर्यावरण विषयक कार्य जाणून घेतले. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीप्रमाणे संपूर्ण पृथ्वीवर राहणारे सर्व मानव जात एकाच कुटुंबातील सदस्य आहेत त्यामुळे देश असो की परदेशात असो प्रत्येकाने आपल्या पृथ्वी ला वाचवण्यासाठी कार्य करीत राहणे काळाची गरज आहे. या उपक्रमात केवळ महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील विविध देशातील पर्यावरण तज्ज्ञांचा विविध उपक्रमात सहभाग असून हे स्वयंसेवक पर्यावरण विषयक जाणीव जागृती करत आहेत.

विविध उपक्रमात सहभाग

घन कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्ती,जगभरातील पर्यावरण विषय कायदे आणि त्याची अंमलबजावणी, वृक्ष लागवड कशी करावी, इको फ्रेंडली सण कसें साजरे करावेत,वस्तूंचा पुनर्वापर आशा विविध प्रकारच्या विषयावर संगीता तोडमल या अनेक कॉन्फरन्स मध्ये सहभागी होऊन प्रोबधन आणि मार्गदर्शन करत आहेत. तसेच तोडमल यांनी अमेरिकेतआपल्या परसबागेत सुमारे 50 हून अधिक वेगवेगळ्या फळभाज्या , फूल भाज्या , पालेभाज्या आणि वेलवर्गीय भाज्या लावून त्यावर विविध प्रयोग केले आहेत आणि तेही सेंद्रिय पद्धतीत तसेच घनकचरा व्यवस्थापन सेंद्रिय खत तेही त्या स्वतः करतात अमेरिकेतील अनेक सामाजिक संस्थांबरोबर त्यांच्या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण विषयक चळवळ सुरू केलेली आहे.

पर्यावरण विषयक जागृतीसाठी  सहयोग

वरील भाग पालेभाज्या, फळभाज्या किंवा टेरेस गार्डन परसबाग आशा विविध विषयांवर महिला बचत गट , हाऊसिंग सोसायटी यामध्ये त्या अनेक वर्ष मोफत मार्गदर्शन करतात,तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वेगवेगळे शाळा कॉलेजेस मधील विद्यार्थ्यांना ही त्या ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या विषयात मार्गदर्शन करतात. कोरोना काळातही त्यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करून एक अनोखा उपक्रम केला . भारताबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या देशातील आणि जगभरातील पर्यावरणाचा अभ्यास करून त्यावर आयोजित विविध चर्चासत्रात , परिसंवादात त्यांनी आपली मते मांडली आहेत. तसेच या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातही शाळा कॉलेजेस आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था यामध्ये पर्यावरण विषयक व्याख्याने देऊन पर्यावरण संवर्धनाची एक पिढी त्या घडवत आहेत

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती… ‘ या उक्तीचा आदर्श घेऊन अमेरिकेत राहूनही त्यांचे कार्य सुरू आहे हे उल्लेखनीय… !!

आपलं सरकार

Click to listen highlighted text!