Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबईतील १६४ पोलीस कोरोनाबाधित

Spread the love

मुंबई : लोकांना कोरोनाविषयक विषयक नियमांचे पालन करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या मुंबई पोलीस दलातील  १६४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३५ पोलिसांना दुसऱ्यांदा लागण झाली. या सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबई पोलीस दलात ७१ जणांचे अहवाल ४ जानेवारीला  कोरोना पॉझिटिव्ह आले होते तर १० व ११ जानेवारीला ही संख्या १२६ व १६४ पर्यंत वाढली असल्याचे वृत्त आहे.

आतापर्यंत आतापर्यंत एकूण ८८७ पोलीस कोरोनाबाधित असून  त्यापैकी ६६२ गृह विलगीकरणात  आहेत तर १३० जण कोविड सेंटरमध्ये असून  ९५ जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मुंबई पोलीस दलात ३९,०८९ जणांचा पहिला, तर ३५,७११ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण

दरम्यान राज्य पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षण व खास पथक विभागाचे आयजी रवींद्र शेणगावकर याच्यासह सहायक महानिरीक्षक रमेश धुमाळ, शीला साईल हे अधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालयीन अधीक्षक, स्टेनो व ऑर्डरली यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे राज्यभरात आजवर 265 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 126 पोलीस हे मुंबईतील आहेत. सध्या राज्यभरात 2,145 पोलीस उपचार घेत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!