CoronaIndiaUpdate : दिल्लीत कोरोनाचा वाढत कहर , आढळले २८ हजार ८६७ रुग्ण

नवी दिल्ली : दिल्लीत आज दुसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर चालूच असून पुन्हा एकदा गेल्या २४ तासांत दिल्लीत तब्बल २८ हजार ८६७ नवीन करोना बाधितांची नोंद झाली असून ही एका दिवसातील आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली आहे. ही केवळ एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या असून २० एप्रिल २०२१ रोजी दिल्लीत २८ हजार ३९५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दिल्लीत कोविड पॉझिटिव्हिटी रेट ही सर्वात चिंतेची बाब आहे. पॉझिटिव्हिटी रेट आज २९.०४ टक्के इतका झाला असून सक्रिय रुग्णांची एकूण संख्या आता ९४ हजार १६० इतकी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे.
अशी आहे दिल्लीतील ताजी आकडेवारी
आज एका दिवसात करोनाच्या ९८ हजार ८३२ चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या २४ तासांत २८ हजार ८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर २२ हजार १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यामुळे दिल्लीतील रुग्णांचा रिकव्हरी रेट ९२.७४ टक्के इतका आहे दरम्यान आज कोरोनाने ३१ रुग्ण दगावल्याने दिल्लीतील मृतांचा एकूण आकडा २५ हजार २७१ वर पोहोचला आहे. दिल्लीतील मृत्यूदर सध्या १.५३ टक्के इतका. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या झाली ६२ हजार ३२४ इतकी.
दरम्यान, देशातील करोना रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ४७ हजार ४१७ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून बुधवारच्या तुलनेत रुग्णांची संख्या २७ टक्क्यांनी वाढली आहे. बुधवारी १ लाख ९४ हजार ७२० रुग्णांची भर पडली होती. गेल्या १६ दिवसांत देशातील स्थिती पूर्णपणे बदलली असून २८ डिसेंबर रोजी केवळ ६ हजार ३५८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आतापर्यंत जवळपास ३९ पटीने रुग्णसंख्या वाढली आहे.