अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सिंधुताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये त्यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.