OmicronNewsUpdate : सावधान !! ओमायक्रॉन रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढू लागली , १०८ रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत चालले आहेत . आज राज्यभरात २० रुग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक ११ तर पुण्यात ६ रुग्ण आढळले आहे. राज्यात आता १०८ रुग्णांनी टप्पा गाठला आहे. राज्य आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. २० रुग्णांपैकी १४ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ६ रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत.
पुण्यात आढळललेल्या ६ रुग्णांमध्ये यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत १ रुग्ण तर पुणे छावणी बोर्डाच्या हद्दीत ५ रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय सातारा २, अहमदनगर १ यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. या २० रुग्णांपैकी १५ जण हे आंतरराष्ट्रीय प्रवासी, तर २ आंतरदेशीय प्रवासी आणि ४ जणांना ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संपर्कातून लागण झाली आहे. यात १२ रुग्णांचे लसीकरण हे पूर्ण झाले होते. तर ७ रुग्णांचे लसीकरण झाले नाही आणि १ रुग्णाचे वय हे १८ वर्षांखालील आहे. दरम्यान, आज राज्यात १४१० रुग्णांचे निदान झाले आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६८ रुग्ण बरे झाले आहे.
Maharashtra reports 1,410 new cases, 12 deaths and 868 discharges today; Active caseload stands at 8,426
20 new cases of Omicron reported in the state today, takes case tally to 108. Out of these, 54 cases have been discharged following a negative RT PCR test pic.twitter.com/LC9QJrPh4p
— ANI (@ANI) December 24, 2021
दरम्यान एकीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली आहे तर दुसरीकडे एकूण करोना रुग्णसंख्येत देखील आज दिवसभरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण १४१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ६६ लाख ५४ हजार ७५५ इतका झाला आहे. त्यापैकी ८ हजार ४२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्याचा रिकव्हरी रेट ९७.५९ टक्के!
राज्यात आज दिवसभरात ८६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या महाराष्ट्रातील एकूण बाधितांचा आकडा आता ६५ लाख १ हजार २४३ इतका झाला आहे. या आकडेवारीनुसार राज्याचा रिकव्हरी रेट हा ९७.५९ टक्के इतका झाला आहे.
१२ कोरोनाबाधितांचा मृत्यू
दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ४०४ इतका झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १६ हजार ३६८ मृत्यू मुंबईत झाले आहेत. राज्याचा मृत्यूदर सध्या २.१२ टक्के इतका आहे.