Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SameerWankhedeNewsUpdate : एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र पुन्हा आले चर्चेत

Spread the love

बारामती : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे पुन्हा एकदा त्यांच्या यांच्या जात प्रमाणपत्रावरून चर्चेत आले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा दावा केला होता. या प्रकरणात नवाब मलिक यांना बदनामीच्या दाव्याला सामोरे जाऊन न्यायालयाची बिनशर्त मागवावी लागली होती . दरम्यान  बारामती येथील माहितीचा अधिकार क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते नितीन यादव यांनी पुन्हा हा मुद्दा चर्चेत आणला आहे . त्यांना मिळलेल्या माहितीनुसार  समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावाने एकही जात प्रमाणपत्र जारी केली नसल्याची धक्कादायक माहिती जात पडताळणी समितीकडून माहितीच्या अधिकारात मिळाली आहे.

नितीन यादव यांनी जात पडताळणी समितीकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत माहिती मागितली होती. तिन्ही समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे देण्यात आलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र व सोबत जमा केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींची जात पडताळणी समितीकडे मागणी केली होती. त्यावर जात पडताळणी समितीने समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावाने जात प्रमाणपत्र जारीच केले  नसल्याचे उत्तरात म्हटले आहे.

याबाबत त्यांच्या अर्जानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर कार्यालयाचा उपलब्ध अभिलेख तपासण्यात आला. त्यामध्ये समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आल्याचे जात पडताळणी समितीने दिलेल्या उत्तरात म्हटले  आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांनी नोकरीसाठी नेमके कोणते प्रमाणपत्र दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!