OmicronNewsUpdate : महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांची सर्वाधिक रुग्णांची नोंद तर देशातील एकूण रुग्णसंख्या २२६

नवी दिल्ली : ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आता या रुग्णांची एकूण संख्या २२६ इतकी झाली आहे. देशातील १४ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात यात १३ रुग्णांची भर पडली असून यामध्ये केरळमध्ये ९ रुग्ण, तर जयपूरमध्ये ४ रुग्णांची नोंद झाली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ रुग्ण आढळून आले.तर दिल्लीत ५४ रुग्ण आढळून आले आहेत.
केरळच्या रुग्णांमध्ये एर्नाकुलममध्ये आलेले ६ जणांचा तर तिरुवनंतपूरमध्ये आलेल्या ३ जणांचा समावेश आहे. या नवीन ९ रुग्णांमुळे केरळमधील एकूण रुग्णांची संख्या २४ वर केली आहे, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांनी दिली आहे. दरम्यान राजस्थानच्या जयपूरमध्ये ओमिक्रॉनचे आणखी ४ रुग्ण आढळले असून .
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याबाबत माहिती दिली असून ओमायक्रॉनपासून कसा बचाव करायचा, हेही सांगितले आहे. ओमायक्रॉन हा अत्यंत संसर्गजन्य व्हेरियंट आहे. यामुळे ओमायक्रॉनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे संपूर्ण लसीकरण करणे आणि कोरोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचना, म्हणजे मास्क , सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दीत टाळण्याचे आवाहन डॉ. गुलेरिया यांनी केले आहे.
दरम्यान ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली सर्व परिस्थितीवर आमचे लक्ष असून ओमायक्रॉनच्या नवीन रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या बदलाचाही अभ्यास चालू असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. तसेच बूस्टर डोसबाबत शास्त्रीयदृष्टीकोनातून आढावा घेतल्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेईल असेही पॉल म्हणाले.
ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता दिल्लीत ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. तसेच ५० टक्के क्षमतेनेच रेस्टॉरंट आणि चित्रपटगृह चालणार आहेत. हरयाणात लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या नागरिकांना सर्वाजनिक ठिकाणी बंदी असणार आहे. एक जानेवारीपासून हा आदेश लागू होईल. लस न घेतलेल्यांना बस, लग्न सोहळा, सरकारी कार्यालये, बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी प्रवेश बंदी असेल. पंजाब सरकारने एक आदेश जारी केला आहे. लसीकरण प्रमाणपत्र नसेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही. ज्यांनी एक किंवा दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनी आपले प्रमाणपत्र सरकारच्या वेबसाइटवर अपलोड करणे आवश्यक आहे.