Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : अमरावतीसारखे प्रकार औरंगाबादेत होऊ नये म्हणून मनसेचे ‘माझा झेंडा माझा स्वाभिमान’ अभियान

Spread the love

औरंगाबाद – अमरावतीसारखे प्रकार औरंगाबादेत होऊ नये म्हणून शहरात माझा झेंडा माझा स्वाभिमान हे अभियान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याआदेशाने राबवला जात असल्याची माहिती  माहिती मनसेचे राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी दिली. आगामी महापालिका निवडणूकीत हिंदू धर्माचा त्याग केलेल्या पक्षाला त्यांची जागा जनतेमार्फत दाखवण्यात येईल असे महाजन यांनी म्हटले आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना महाजन म्हणाले कि , राजकिय पक्ष आपले विचार जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व उपाय करतातच. हाच उद्देश माझा झेंडा, माझा स्वाभिमान संकल्पनेचा आहे. आता पर्यंत शहर आणि जिल्हा परिसरात अंदाजे हजार कार्यकर्त्यांच्या घरावर छत्रपती शिवाजी राजांची मुद्रा असलेले ध्वज लावण्यात आलेले आहे. औरंगाबाद  शहर व परिसरातील कार्यकर्त्यांच्या घरी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष आशिष सुरडकर यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या घरावर छत्रपती शिवाजी राजांची मुद्रा असलेला झेंडा लावत आहेत.

दरम्यान मनसे मधे पक्षश्रेष्ठींना नको असलेल्या कार्यकर्त्यांचीच हाकालपट्टी झालेली आहे.यालाही महाजन यांनी दुजोरा दिला. हाकालपट्टी करण्यापूर्वी त्यांनी केलेल्या कृत्याचे पुरावे पक्षातल्या जेष्ठ नेत्यांपुढे ठेवण्यात आलेले आहेत. पक्षातून हकालपट्टी केलेल्यांमध्ये संदीप कुलकर्णी,चेतन शर्मा,रमेश पुरी, दिपक पवार यांचा समावेश असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!