MaharashtraNewsUpdate : माजी नगराध्यक्ष श्यामल तडे यांची गळफास घेऊन आत्महत्या

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा श्यामला मनोज ताडे (वय ४०) यांनी आज पहाटे गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी पहाटे ताडे यांचा मृतदेह त्यांच्या घरात पंख्याला लटकल्याच्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी साडीने गळफास लावून घेतल्याचे दिसून येत होते. दगडू ताडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला यासंबंधी माहिती कळविली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. डॉक्टरांनी ताडे यांना मृत घोषित केले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी देऊन पुढील तपास सुरू केला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या कुटुंबीयांकडून पोलीस अधिक माहिती घेत आहेत. दहा वर्षांपूर्वी ताडे या श्रीगोंद्याच्या अडीच वर्षे नगराध्यक्षा होत्या. त्यावेळी हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. त्या आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या. अलीकडे मात्र त्या किंवा त्यांचे पतीही शहराच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते.