IndiaNewsUpdate : व्वा मोदीजी व्वा !! भुतानने जाहीर केला सर्वोच्च पुरस्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांना आतापर्यंत  सऊदी अरब, अफगानिस्तान, फलिस्तीन, संयुक्त अरब अमिरात, रशिया आणि मालदीव या राष्ट्रांनी आपल्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर आता भुताननेही  पंतप्रधान मोदी यांना  त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

Advertisements

भुतानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन मोदींना भुतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. तसेच, आम्हाला हा पुरस्कार घोषित करताना अत्यानंद होत असल्याचेही ट्विटरवरुन म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना महामारीच्या संकटात आणि त्या अगोदरही भुतान राष्ट्राला केलेली मदत व सहकार्य हे अतुट आहे. त्यामुळे, हा सन्मान तुमचा हक्क असल्याचे भुतानच्या पीएमओ कार्यालयाने म्हटले आहे. भुतानच्या सर्व नागरिकांकडून आपले अभिनंदन, असे ट्विट करत पीएमओने मोदींचा भुतान भेटीचा एक फोटोही शेअर केला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!