AurangabadCrimeUpdate : बेगमपुरा खून प्रकरणातील आरोपी गुन्हे शाखेने पकडला

औरंगाबाद : बेगमपुरा खून प्रकरणातील मयत कृष्णा जाधव (२२) याच्या खून्याला सकाळी १०,३०वा. दहेगावबंगला परिसरात गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्याला अटकेच्या प्रक्रियेसाठी बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आनंद टेकाळे (२१) रा.दाभाडी जि.जालना असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.तो एमजीएम महाविद्यालयात हाॅटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो.
पोलिसांना आरोपीने दिलेल्या माहिती नुसार मयत कृष्णा जाधव चे आरोपी टेकाळेकडे ६ हजार रु.बाकी होते. ते मागण्याकरता आरोपीकडे मयत चाकू घेऊन रोजाबाग भागात ज्या ठिकाणी आरोपी टेकाळे व त्याचे मित्र दारु पित बसले होते त्या ठिकाणी आल्यानंतर दोघांमधे वाद झाला आणि आनंद टेकाळेने रागाच्या भरात कृष्णा जाधवचा खून केला.
असा लागला सुगावा
मयत कृष्णा जाधव च्या बहीणीने त्याचे चार खास मित्र असल्याची माहिती गुन्हेशाखेला दिली.चार मित्रांपैकी तिघांचे फोन सुरु होते.पण आनंद टेकाळेचा फोन बंद येत होता.त्यावेळेस त्याचे लोकेशन रोजाबाग दिसंत होते.त्यानुसार पीएसआय म्सह्के यांचा संशय बळावला.त्याचा फोन सुरु होताच त्याचे लोकेशन गंगापूर रोडवरील दहेगाव बंगला असे दिसताच गुन्हेशाखेने दहेगाव परिसरातून आनंद टेकाळेला पकडले.
वरील कारवाई पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता, पोलिसउपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसनिरीक्षक अविनाश आघाव व पीएसआय अमोल म्हस्के एएसआय सतीश जाधव, पोलिस कर्मचारी विजू पिंपळे,मिसाळ, यशवंत ठाकूर यांनी पार पाडली.