MaharashtraPoliticalUpdate : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले म्हणाले , ” हा तर शुद्ध वेडेपणा !!”

कोल्हापूर : औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळत नकळत काढलेल्या उद्गारावरून सर्वच राजकीय नेत्यांच्या उलट सूलट प्रतिक्रिया येत आहेत. याच विषयावर कोल्हापुरात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘महाविकास आघाडीतील एका पक्षात मी प्रवेश करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य शुद्ध वेडेपणा आहे,’ असे प्रत्युत्तर दिले.
दरम्यान औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील हे कदाचित महाविकास आघाडीतील एका पक्षात येणार असतील, असा टोला लगावला होता. त्याबाबत कोल्हापुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना , ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. आपले राजकीय भवितव्य ठरवण्याचा अधिकार हा फक्त भाजप आण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांना आहे. कारण मी त्यांच्या संस्कारात वाढलो आहे.’
आपण काय ज्योतिषी नाही…
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका विधानानंतर भाजप-शिवसेनेच्या संभाव्य युतीवर बोलताना , ‘मुख्यमंत्र्यांनी हे सकारात्मक विधान कोणत्या आधारावर केले याची आपण त्यांच्याकडे चौकशी करू. त्यांच्या मनात नेमके काय आहे हे कळायला आपण काय ज्योतिषी नाही,’ असं पाटील म्हणाले.