Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात विक्रमी लसीकरण झाले पण अनेकांना लस न घेताच आले मॅसेज !!

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला भारताने आज इतिहास रचल्याचा दावा करीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी कोविन-पोर्टवरील आकडेनुसार देशात आज २ कोटी २२ लाख २८ हजार ६७५ नागरिकांना कोरोनावरील लस दिली गेली असल्याचे म्हटले आहे. देशातील आरोग्य कर्मचारी आणि जनतेने पंतप्रधान मोदींना हि वाढदिवशी दिलेली भेट असल्याचे म्हटले आहे. मात्र असे असताना अनेकांना लस न घेताच लस घेतल्याचे मॅसेज आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत या यशाचा आनंद साजरा केला. या यशाचे श्रेय मांडवीय यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. देशात आज लसीकरण मोहीमेत प्रत्येक सेकंदाला ५२७ डोस म्हणजे प्रत्येक तासाला १९ लाख लसीचे डोस दिले जात होते असे म्हटले जात आहे. पण आज या लसीकरण मोहीमेत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. लस घेतली नसतानाही अनेकांना लस घेतल्याचे मेसेजेस आले.

… पण लस न घेताच आले मेसेजे !!

बिहारच्या नालंदात राहणाऱ्या राजू कुमारना दुपारी ४ वाजता एक मेसेज आला. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला गेला आहे, असा तो मेसेज होतो. यानंतर राजू कुमार यांनी या मेसेजचा स्क्रिन शॉट शेअर करत ट्वीट केले कि , मी आज लस घेतली नाही. तरीही आपल्याला लसीचा दुसऱ्या डोस घेतल्याचा मेसेज आला.
याशिवाय मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये राहणाऱ्या अश्वीन पाटीदार यांनाही लस घेतलेली नसताना ती घेतल्याचा मेसेज आला. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींना टॅग करत बनावट लसीकरणाचा मेसेज शेअर केला. सामान्य नागरिकांना धोका दिला जात आहे. केंद्रावर लसीकरणासाठी स्लॉट बुक झाला होता. पण आज लस दिली जाणार नाही, असे तिथे गेल्यावर समजले. मग स्लॉट दिलेच का? आणि आता लस न घेताच ती घेतल्याचा मेसेज आला, असे पाटीदार यांनी म्हटले आहे.

दरम्यान अशाच प्रकारे अनुराग प्रसिद्ध आणि त्यांची आई अर्चना झा यांना लस न घेताच करोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून लस घेण्यासाठी स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न करतोय. पण मिळाला नाही. आता मेसेज आलाय. लसीकरण केंद्रावर न जाताच लसीचा दुसरा डोस दिला गेला, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

याशिवाय उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमधील रहिवासी शिवम भट्ट यांनी कोरोनावरील लसीकरणासाठी १७ सप्टेंबरचा स्लॉट बुक केला होता. पण काही कारणामुळे ते लस घ्यायला जाऊ शकले नाही. पण दुपारी ३ वाजता त्यांना एक मेसेज आला. तुम्हाला कोरोनावरील लसीचा दुसरा डोस दिला गेला आहे, असा तो मेसेज होता. यावर सीएमओनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि , काही तांत्रिकराणामुळे असे होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!