CongressNewsUpdate : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी , डॉ.प्रज्ञा सातव यांच्यासह अनेकांना संधी

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. यामध्ये दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ.प्रज्ञा सातव यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर लेटर बॉम्ब फोडणाऱ्या आशिष देशमुखांनाही जनरल सेक्रेटरीपदाची संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकरणीत १८ उपाध्यक्ष ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सेक्रेटरींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत काँग्रेसचे दिवंगत नेते माणिक जगताप यांच्या जागी त्यांच्या मुलीला तर दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नीला काँग्रेस कार्यकरणीत स्थान देण्यात आले आहे. तर, वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे भाऊ आणि आमदार धीरज देशमुख जनरल सेक्रेटरीपदाची तर माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे चिरंजीव शैलेश शिवराज पाटील चाकूरकर यांनाही जनरल सेक्रेटरी म्हणून जबाबदारी दिली आहे. याशिवाय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांकडे जनरल सेक्रेटरीपद देण्यात आले असून सचिन गुंजाळ यांच्याकडे सचिवपद देण्यात आले आहे.