CoronaMaharashtraUpdate : राज्यात ४ हजार ३६५ नव्या रुग्णांचे निदान, ६ हजार ३८४ डिस्चार्ज

मुंबई: राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज एकूण ६ हजार ३८४ इतके रुग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात झालेल्या १०५ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर मात्र २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख २१ हजार ३०५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित घट
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५५ हजार ४५४ वर आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ५५८ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ७ हजार ०२२ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६ हजार ६५८ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ५ हजार २१० इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ७०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ४ हजार ५८० इतके रुग्ण आहेत.
मुंबईत ३०७७ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ होत ती ३ हजार ०७७ वर आली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ५४४, सिंधुदुर्गात १ हजार १५४, बीडमध्ये १ हजार ०८१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७०९ इतकी आहे. रायगडमध्ये ८९६ इतके रुग्ण आहेत.
नंदुरबारमध्ये एकही रुग्ण नाही
या बरोबरच नांदेडमध्ये ही संख्या ४४ इतकी आहे. जळगावमध्ये ३८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १४३ इतकी झाली आहे. अमरावतीत ही संख्या ८९ वर खाली आली आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९ इतकी आहे. तसेच, धुळ्यात ६ तर भंडाऱ्यात ४ रुग्ण आहेत. गोंदिया जिल्ह्यात २ सक्रिय रुग्ण आहे. तर
औरंगाबाद जिल्ह्यात ११ नवे रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण ११ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ४७ हजार ८३० झाली आहे. आज २२ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष ४४ हजार १३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून आजपर्यंत एकूण तीन हजार ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६९रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
३,२२,२२१ व्यक्ती होम क्वारंटाईन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १९ लाख २१ हजार ७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख १५ हजार ९३५ (१२.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २२ हजार २२१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.