Aurangabad Crime Update : शहर आणि ग्रामीण गुन्हेशाखेच्या कारवाया, दोन महिलांसहित चौघांना अटक

औरंगाबाद – शहर गुन्हेशाखा आणि ग्रामीण गुन्हेशाखेने केलेल्या वेगवेगळ्या कारवायात दोन महिलांसहित चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या तर ६७ हजार ८००रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींना मुकुंदवाडी आणि गंगापूर पोलिसांकडे सूपूर्द करण्यात आले.
शहर गुन्हेशाखेने केलेल्या कारवाईत रेकाॅर्डवरचे तीन गुन्हेगार अटक केले असून त्यांनी १६आॅगस्टच्या मध्यरात्री सिल्लोडच्या फोटोग्राफरला सिडको बसस्थानक परिसरात मारहाण करत ६हजार रु.रोख व ९हजारांचा मोबाईल हिसकावला होता.या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.अटक आरोपींमधे शेख इरफान शेख लाल (२५) अर्जून भाऊसाहेब नागवे (२५) सचिन भूजंग मिसाळ (२५) या रेकाॅर्डवरच्या गून्हेगारांचा समावेश आहे. वरील कारवाई पोलिस उपनिरीक्षक योगेश धोंडे, सहाय्यक फौजदार सय्यद मुजीब, पोलिस कर्मचारी गजानन मांटे राहूल खरात यांनी पार पाडली.ही कारवाई पार पाडण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे,पोलिस निरीक्षक आघाव, सुधाकर बावकर यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई
तर ११आॅगस्ट रोजी गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे झालेल्या घरफोडीत ५लाख ६८हजारांचा ऐवज लंपास करण्याच्या गून्ह्यात गून्हेशाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी
भांड्या उर्फ मनोज टाबर चव्हाण, रंजना भांड्या चव्हाण रा.म्हारोळा ता.पैठण हे दोघे नवरा बायको तर अर्चना शामल काळे(१९) रा.वाकीटाकी बीड अशा तिघांना अटक केली. वरील तिन्ही आरोपींनी घरफोडीची कबुली देत ५२हजार ९००रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केली वरील तिघांवर शिल्लेगाव,देवगाव रंगारी या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.वरील कारवाईत पीएसआय संदीप सोळंके,गणेश राऊत, पोलिस कर्मचारी विठ्ठल राख,जनाबाई राठोड, वाल्मिक निकम यांनी सहभाग घेतला होता.