AurangabadCrimeUpdate : गुन्हेशाखा व मुकुंदवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई, दोन मंगळसूत्र चोर मुद्देमालासह अटक

औरंगाबाद – मुकुंदवाडीपोलिस आणि गुन्हेशाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत रेकाॅर्डवरचे दोन मंगळसूत्र चोर मुद्देमालासहित अटक झाले आहेत
विक्की उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे व योगेश प्रकाश चौतमल अशी अटक आरोपींची नावे आहेत. २ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वा. जयभवानीनगरात पाणी भरण्यासाठी जाणार्या शिवानी अरविंद गाडवे (२४) यांचे ९ ग्रँ.चे २२ हजार रु.चे मंगळसूत्र हिसकावून वरील दोन चोरट्यांनी पळ काढल्याचे पोलिस तपासात उघंड झाले होते. वरील आरोपींचा शोध घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, ऊपीआय मनोज शिंदे, पीएसआय अमोल म्हस्के, पोलिस कर्मचारी नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे , सुधाकर पाटील यांनी पार पाडली.