AurangabadCrimeUpdate : हातावर गुंगी येणारा द्रव टाकून ३२ हजारांच्या अंगठ्या काढून भामटा साधू फरार

औरंगाबाद – गुरुपोर्णिमेचे निमित्त साधून विवाहितेला घरात घूसुन तिच्या हातावर तांदूळ आणि कुंकासोबत गुंगी येण्याचा ओलसर द्रव टाकून टाकत हिर्याची आणि सोन्याची अंगठी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गून्हा दाखल झाला आहे.
चेतना निखील भावसार (३६) रा.गुरुसहानीनगर असे फसवले गेलेल्या गृहणीचे नाव आहे. त्या आज सकाळी ११ वा.मुकुंदवाडीतील ज्ञानेश्वरी काॅलनीत चेतना यांच्या आत्या विजया तांदळे यांच्याकडे पतीने नेऊन सोडले. त्याचवेळेस अंदाजे वयवर्षे ४५ असलेला काळासावळा इसम गुरुपोर्णिमेचे निमित्तसाधून घरात घूसला व अंर्तज्ञानी असल्याचे भासवत फिर्यादी यांना तांदुळ आणि कुंकासोबत सोबत गुंगी आणणारा द्रव तिच्या हातावर टाकला आणि फिर्यादीच्या हातातील हिर्याची आणि सोन्याची अशा दोन ७ ग्रॅमच्या अंगठ्या अलगद काढून घेतल्या. दरम्यान फिर्यादी भानावर येताच त्यांना घरच्या देवाचे दर्शन घेऊन या असे सांगितले व फिर्यादी घराकडे वळताच तांदळे यांच्या घरुन भामटा फरार झाला.
दरम्यान चेतना भावसार जेंव्हा घरी गेल्या तेंव्हा त्यांच्या बोटातील अंगठ्या गायब असून घरात घुसलेला बुवा फरार झाल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस अधिक तपस करीत आहेत