MaharshtraRainUpdate : काळजी घ्या : मुंबई आणि परिसरात वाऱ्यांसह जोरदार पाऊस तर मराठवाड्यात मुसळधार

मुंबई : येत्या ३ ते ४ तासात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण आणि उपनगरातील भागांमध्ये वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. या भागात वाऱ्यांचाही वेग वाढला असून नागरिकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.
Latest satellite image at 10.50 pm 21/7
Mumbai Thane Palghar Nashik Raigad parts of ghat areas to be watched for next 3, 4 hrs
Already IMD has issued nowcast for very intense rains in these areas
Parts of Vidarbha also indicates some intense development
Watch for IMD Updates pl pic.twitter.com/SrCHer9o3b— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 21, 2021
राज्याच्या हवामान विभागाला नुकत्याच मिळालेल्या सॅटेलाइट चित्रानुसार मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड या घाट भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. त्याशिवाय विदर्भातील काही भागातही पावसाला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. या माहितीनुसार नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद या भागात येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Active rainfall spells continuing over parts of interior Maharashtra too. Moderate to intense spells of rain very likely to occur in most Nasik, Pune, Satara, Sangli, Solapur, Jalgaon, Ahmednagar, Dhule,Kolhapur, Nanded,Hingoli, Beed, Jalna, Latur&Osmanabad during next 3-4 hrs. pic.twitter.com/oayYtZ79FU
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 21, 2021
21/7, Some intense clouds over Mumbai Suburbs, Thane Kalyan and adjoining areas observed now in Mumbai radar obs at 10.30 pm with max intensity (reflectivity) around 40 dBz with yellowish shade, cloud heights varying between 6 to 9km plus.
watch for the rainfall and IMD Updates pic.twitter.com/QnBSKgroLS— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 21, 2021