Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

Spread the love

नवी दिल्ली : मुस्लिम बांधवांकडून आज देशभरात मोठ्या उत्साहाने  ईद – अल – अजहा अर्थात बकरी ईद साजरा केला जात आहे. या निमित्ताने  राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जगभरातील मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद हा सण ‘कुर्बानी दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार, रमजानच्या दोन महिन्यानंतर बकरी ईद साजरी केली जाते. सामान्यत: आजच्या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो त्यामुळे भारतात ईद-अल-अजहा हा दिवस बकरी ईद म्हणून साजरा केला जातो. या धार्मिक प्रक्रियेला ‘फर्ज-ए-कुर्बान’ असे म्हटले  जाते.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्विटद्वारे ईदच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे कि , सर्व देशवासियांना ईद मुबारक! ईद-उझ-जुहा हा प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनां प्रती आदर व्यक्त करण्यासाठी तसंच सर्वसमावेशक समाजात ऐक्य आणि बंधुत्वासाठी एकत्र काम करण्याचा सण आहे. याच निमित्तानं आपण कोविड – १९ च्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा आणि सर्वांच्या आनंदासाठी काम करण्याचा संकल्प करू’ . दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे कि ,  ‘ईद मुबारक! ईद अल अधाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस सामूहिक सहानुभूति, सद्भाव आणि अधिकाधिक सेवा समावेशकतेच्या भावनेला पुढे घेऊन जावो’ .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!