Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : राजकीय निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर ?

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची दोनवेळा भेट घेतल्यानंतर राजकीय निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस नेते सोनिया गांधी , राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. पवार यांच्या भेटीआधी प्रशांत यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. या सर्व भेटींच्या मागे मोदी सरकारच्या विरोधात नवी रणनीती आखण्याचा प्रयत्नात प्रशांत किशोर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन प्रशांत किशोर २०२४ च्या तयारीसाठी काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रशांत कुमार यांनी काँग्रेस हाय कमांडशी झालेल्या बैठकीनंतर असे अनुमान वर्तविले जात आहे की, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी ते एक मोठा आराखडा तयार करीत आहेत. त्यासोबत असेही म्हटले जात आहे की या बैठकीत पंजाब काँग्रेसचे दोन प्रमुख नेते सीएम अमरिंदर सिंग आणि नवजोतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांबद्दलही चर्चा झाली.

दरम्यान, काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून पुन्हा एकदा सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणुकीची शक्यता आहे. तर राहुल गांधी लोकसभेत काँग्रेसचे नेते, होऊ शकतात का, याचीही चाचपणी केली जात आहे. सध्या अधीर रंजन चौधरी हे लोकसभेत काँग्रेसचे नेते आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!