Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ModiCabinetExpansion Live : मोदीमंडळात मोठी उलथा पालथ !! ९ केंद्रीय मंत्र्यांवर “नमोस्त्र”

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच मंत्रिमंडळावर “नमोस्त्र” चालवून कॅबिनेटच्या विस्तारापूर्वी तब्बल ९ केंद्रीय मंत्र्यांना दणका दिला आहे. विशेष म्हणजे यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी या नेत्यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे वृत्त आहे. आता त्यांचा खांदेपालट होणार कि , सरळ पक्षाचा रास्ता दाखवणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे मोदी सरकारमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.


दरम्यान कालच मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गहलोत यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्यावर कर्नाटकच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गहलोत यांच्याकडे राज्यसभेचे सदस्यपद आणि भाजपाच्या संसदीय मंडळाचेही महत्वाचे पद होते.

थावर चंद गहलोत यांच्यानंतर केंद्रीय
१. आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. कोरोनाकाळात समाधानकारक कामगिरी न केल्याचा फटका त्यांना बसला आहे. हर्षवर्धन यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचाही कारभार होता. आता हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याने दोन मंत्रालय रिक्त झाले आहेत.

२. पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो : पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून खासदार निवडून आलेले बाबुल सुप्रियो यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. बाबुल सुप्रियो पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत उतरले होते. परंतु ५० हजार मतांनी त्यांचा पराभव झाला.

३. महिला आणि बालविकास मंत्री देबोश्री चौधरी : पश्चिम बंगालच्या रायगंड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले देबोश्री चौधरी यांनाही राजीनामा द्यायला सांगितला आहे.
४. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक : उत्तराखंडच्या हरिद्वार येथून खासदार असलेले रमेश पोखरियाल निशंक यांनाही राजीनामा देण्यात सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना झाल्यामुळे ते एक महिना उपचारासाठी दवाखान्यात होते. त्यामुळे आरोग्यविषयक कारणाने त्यांचा राजीनामा घेतला गेला असल्याचे आहे.

५. रासायनिक आणि खते उत्पादन मंत्री सदानंद गौडा : कर्नाटक बंगळुरू येथील सदानंद गौडा यांनीही राजीनामा दिला आहे.

६. कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार : उत्तर प्रदेशच्या बरेली येथील खासदार संतोष गंगवार यांनाही राजीनामा द्यायला सांगितला आहे. या मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे होता. त्यांच्या जागेवर लखीमपूर येथील खासदार अजय मिश्रा यांना मंत्रिपद दिले जात असल्याची चर्चा आहे.
७. शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे : महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे निवडून आले आहेत.

८. जलशक्ती मंत्री रतनलाल कटारिया : हरियाणातील अंबाला येथील खासदार रतन लाल कटारिया यांचाही राजीनामा घेतला असून त्यांच्या जागेवर खासदार सुनीता दुग्गल यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
९. प्रताप सारंगी : ओडिशातील बालासोर येथील खासदार प्रताप सारंगी यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. ते सूक्ष्म, लघु व मध्यम यांच्यासह पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!