Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ModiCabinetExpansion : महाराष्ट्रातून राणे , कपिल पाटील , डॉ. भागवत कराड पोहोचले मोदींच्या दरबारात

Spread the love

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज होत असलेल्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विस्तारासाठी महाराष्ट्रातून नारायण राणे,  आगरी समाजाचे नेते कपिल पाटील,  औरंबादहून डॉ. भागवत कराड, हिना गावित, रणजीत नाईक-निंबाळकर यांना दिल्लीचे निमंत्रण आल्याने राज्यातील या नेत्यांना विस्तारित मंत्रिमंडाळात संधी मिळणार असल्याची चर्चा चर्चा आहे. दरम्यान दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असून नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी मोदींच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र चालू आहे.

या संदर्भात होत असलेल्या वृत्तानुसार दिल्लीमध्ये सकाळी ११.३० वाजल्यापासून नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी भेटीगाठी सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. दरम्यान महाराष्ट्रातून नारायण राणेंसह कपिल पाटील, भागवत कराड मोदींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र  हिना गावित आणि रणजीत नाईक-निंबाळकर अद्याप भेटीसाठी पोहोचलेले नाहीत.

याशिवाय आधीच्या चर्चेप्रमाणे आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस, जनता दलाचे (संयुक्त) लल्लन सिंह व आरसीपी सिंह, भाजपच्या रिटा बहुगुणा-जोशी, पंकज चौधरी, रामेश्वर कथेरिया, वरुण गांधी, सी. पी. जोशी, राहुल कासवान तसेच ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल आदी नेतेही मंगळवारी राजधानीत आले असून, या नेत्यांशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे समजते. काँग्रेसमधून नुकतेच भाजपामध्ये गेलेले जितीन प्रसाद तसेच, तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे दिनेश त्रिवेदी यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!