AurangabadCrimeUpdate : मास्क का लावला नाही अशी विचारणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जवानाची मारहाण

औरंगाबाद : मास्क का लावला नाही अशी विचारणा करणाऱ्या पोलिसांना दमदाटी करणाऱ्या तरुणाला जाब विचारताच संतप्त तरुणाने पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडावर मारून जखमी केले आहे . सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास नगर नाक्यावर हि धक्कादायक घटना घडली.
गणेश गोपीनाथ भुमे (३४) असे आरोपी तरुणाचे नाव असून तो रेंजर टू. एनएसजी. सेंट्रल आर्म पोलिस फोर्स दिल्ली येथे कार्यरत आहे. गणेश हा मूळचा फुलंब्रीचा राहणारा असून तो सध्या सुट्टीवर आला आहे.
नगर नाक्यावर पोलिसांचे एक पथक ड्युटीवर असताना मास्क न घातलेल्या गणेश भूमीशी पोलिसांचा वाद झाला तेंव्हा एपीआय पांडूरंग भागिले पुढे आले असताना आरोपीने भागिले यांच्या तोंडावर मारहाण करून त्यांना जनजामी केले व अन्य पोलिस कर्मचार्यालाही मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
निलंबनाच्या कारवाईसाठी दिल्लीला संपर्क
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी याबाबत गुन्हा दाखल होताच दिल्ली येथील सेंट्रल आर्म पोलिस फोर्सकडे आरोपी भूमे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी प्रक्रिया पार पडली जात असल्याची माहिती महानायक ऑनलाईनशी बोलताना दिली.