Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ता आदेश आटोटेची हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

अकोला : औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते आदेश आटोटे ३५ याची अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर येथून जवळच असलेल्या समशेरपूर येथे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे त्याची हत्या केलेल्या आरोपीचाही मृत्यू झाला आहे. हि हत्या का करण्यात आली यांचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Advertisements

आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. सोशल मिडियावर आदेशला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

धम्मपाल उर्फ आदेश महादेव आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता होता. तो औरंगाबाद येथे वास्तव्यास होता. मूर्तिजापूर येथील प्रतीक नगरमध्ये राहणारा ५५ वर्षीय आरोपी दिपकराज डोंगरे हा २९ तारखेपासून धम्मपाल याच्या मार्गावरच होता. धम्मपाल आपल्या भाच्याच्या लग्नासाठी २९ जून रोजी आपल्या गावी  मूर्तिजापूर इथे आला असता त्याची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला असून मृतकाचा भाऊ हा किरकोळ जखमी झाला आहे.
३० जून रोजी दिपकराज डोंगरे याने धम्मपाल याला घरीच समशेरपूर येथे गाठून त्याच्या पोटात चाकूने व कोयत्याने सपासप वार केले. यात धम्मपाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान आदेशचा मोठा भाऊ भांडण सोडवण्यासाठी गेला असता दोघांनमध्ये वाद झााला तेंव्हा त्यात त्याच्या उजव्या हातावर चाकू लागल्याने तो जखमी झाला.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दिपकराज डोंगरे हा देखील गंभीररीत्या जखमी झाला होता.  त्याला  उपचारासाठी अकोला इथे पाठविण्यात आले होते. मात्र, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!