CoronaNewsUpdate : आजपासून १८ वर्षाहून अधिक नागरिकांसाठी मोफत लसीकरण

नवी दिल्ली : आजपासून देशात १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकासाठी मोफत लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मोफत लसीकरणााची घोषणा केली. त्यांनी आपल्या घोषणेत म्हटलं होतं की, २१ जूनपासून सरकार १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचं विनामूल्य लसीकरण करेल. आजपासून जगातील सर्वात मोठ्या मोफत लसीकरण मोहिमेची सुरुवात होत आहे.
नवीन लसीकरण मोहिमेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिक थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. यापूर्वी ही लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना CoWIN पोर्टलद्वारे अपॉईंटमेंट घेणे आवश्यक होते. मात्र या मोहिमेनुसार, १८ वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत लस दिली जाईल. या मोठ्या लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेल आणि राज्यांना काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. दरम्यान खासगी रुग्णालयात लस मिळण्यासाठी किंमत मोजावी लागेल.