AurangabadNewsUpdate : औरंगाबादेत आत्महत्येच्या दोन घटना , एक पोलीस तर दुसरा रेकॉर्डवरचा गुन्हेगार

आकाश अर्जून चाटे
औरंगाबाद – रेकाॅर्डवरचा गुन्हेगाराने गळफास घेतल्याची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत असणार्या पोलिस हेडकाॅन्सटेबलने खुलताबादेत राहत्या घरी गळफास घेतल्याची नोंद खुल्ताबाद पोलिसांनी या घेतली आहे.दोन्ही आत्महत्ये मागचं कारण अस्पष्ट असून मयतांच्या नातेवाईकांची कोणाविरुध्दही तक्रार नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला.
आकाश अर्जून चाटे (२२) रा.गारखेडा परिसर या रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराने राहत्या घरात साडीने गळफास घेतला.मयत आकाशच्या विरोधात ९गुन्हे पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.या प्रकरणी पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस करत आहेत. तर प्रभूदास म्हस्के (५३) या पोलिस कर्मचार्याने खुल्ताबादला राहत्या घरी आज सकाळी १०च्या सुमारास गळफास घेतला. त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.म्हस्के हे पोलिस अधिक्षक कार्यालयात काम करंत होते.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रेंच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कोमल शिंदे करंत आहेत.