AurangabadNewsUpdate : दुःखद बातमी : अज्ञात वाहनाच्या धडकेत फुगे विक्रेता मुलीसह ठार,मेव्हणा गंभीर

औरंगाबाद – आज सकाळी (१३/०६)दौलताबाद घाटमाथ्यावर सकाळी ११.३०वा.अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवर ट्रिपलसीट जाणारे बाप आणि विवाहित मुलगी ठार झाली आहे.हे फुगे विक्रीचा व्यवसाय करतात.तर विवाहितेचा मामा गंभीर जखमी झाला आहे.हे तिघे खुलताबादहून शहराकडे येत होतेपर्यटनस्थळी फुगे विक्रीचा व्यवसाय करत हौते.या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
मोनिका गणेश रेनवाला (२३) व दामोदर परदेशी (४०) रा.जाधववाडीहे ठार झाले. बद्री साईप्रसाद जाधव(४५) रा.पडेगाव हे गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी पोलिसांनी घाटी रुग्णालयात हलवले आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय दिलीप बचाटे करंत आहेत.
धावत्या रेल्वे चा धक्क्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाला
नगरसोल रोटेगाव स्टेशन दरम्यान ची घटना
जखमीस रेल्वे सेना टीम व RPF च्या मदतीने औरंगाबाद येथे नेण्यात येत आहे. अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.