Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जाणून घ्या आजच्या घडीला कोणता राजकीय पक्ष किती मालदार ? कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या ?

Spread the love

नवी दिल्ली :  २०१९-२० या वर्षात  कोणत्या राजकीय पक्षाला किती देणग्या मिळाल्या याचा लेख जोखा पहिला असता ,  निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सर्व पक्षांना मिळून २० हजार कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत . यामध्ये भाजपाला मिळालेल्या देणग्यांचा आकडा तब्बल ७५० कोटींच्या घरात असल्याचे वृत्त आहे. दरम्यान याच काळात काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांपेक्षा हा आकडा तब्बल पाच पटींहून अधिक असल्याचे  आकडेवारीवरून स्पष्ट झाले  आहे.  या वृत्तानुसार भाजप सत्तेत आल्यानंतर गेल्या  ७ वर्षांपासून देशात सर्वाधिक देणग्या  मिळवणारा भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

कुठल्या पक्षाला किती देणग्या ?

देशातील राजकीय पक्षांपैकी नोंदणीकृत राजकीय पक्षांपैकी ३५ पक्षांनी आपला लेखा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला असून देशात सर्वाधिक ७८५.७७  कोटी रुपयांची देणगी भाजपाला मिळाली असून याच काळात काँग्रेसला१३९.१ कोटी,, राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ .९४ कोटी, टी आर एस १३०.४६ कोटी, शिवसेना १८.६१ कोटी , वायएसआरसीपी ९२.७ कोटी, बीजेडी ९०.३५, एआयए डिएमके ८९.६ कोटी, आप ४९.६५ कोटी आणि  तृणमूल काँग्रेसला ८ कोटी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला १९.६९ कोटी , मनसे २४.५८ लाख , एमआयएम १३.८५ लाख आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला १.९ कोटी इतक्या रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत. बहुजन समाज पार्टीने मात्र आपल्या अहवालात निरंक अशी माहिती दिली आहे.


कोण आहेत भाजपाचे  देणगीदार ?

याबाबत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या मालकीची ज्युपिटर कॅपिटल (१५ कोटी), ITC ग्रुप (७६ कोटी), आधीची लोढा डेव्हलपर्स आणि आत्ताची मॅक्रोटेक डेव्हलपर्स (२१ कोटी), बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी (३५ कोटी), प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट (२१७.७५ कोटी) आणि जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट (४५.९५ कोटी) यांचा समावेश आहे. भाजपाला सुधाकर शेट्टी यांच्या गुलमर्ग रिएल्टर्सकडून देखील ऑक्टोबर २०१९मध्ये जवळपास २० कोटींची देणगी मिळाली आहे. जानेवारी २०२०मध्ये ईडीने सुधाकर शेट्टी यांची कार्यालये आणि घरांवर छापे टाकले होते.


इलेक्टोरल ट्रस्ट म्हणजे काय?

‘इलेक्टोरल ट्रस्ट’  ही अशी खंपनी असते ज्यात स्वेच्छेने जमा केल्या जाणाऱ्या देणग्या एकत्र केल्या जातात आणि त्या पुढे राजकीय पक्षांना वितरीत केल्या जातात. याच्या देणगीदारांमध्ये प्रामुख्याने कॉर्पोरेट हाऊसेसचा समावेश असतो. या कंपनीमध्ये राजकीय पक्षांसाठी देणगी देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जातं. प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टमध्ये भारती एंटरप्रायजेस, जीएमआर एअरपोर्ट डेव्हलपर्स आणि डीएलएफ लिमिटेड हे मोठे देणगीदार आहेत. तर जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टमध्ये जेएसडब्ल्यू ग्रुपच्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या जमा होतात.

१४ शिक्षणसंस्था देखील देणगीदार!

भाजपाला मोठ्या प्रमाणावर देणगी देणाऱ्यांमध्ये देशातील १४ शिक्षणसंस्थांचा देखील समावेश आहे. दिल्लीच्या मेवाड युनिव्हर्सिटीने २ कोटी, कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंगने १० लाख, सूरतच्या जी. डी. गोएंका इंटरनॅशनल स्कूलने २.५ लाख, रोहतकच्या पठानिया पब्लिक स्कूलकडून २.५ लाख, भिवानीच्या लिटल हार्ट्स कॉन्व्हेंट स्कूलकडून २१ हजार तर कोटाच्या अॅलन करिअरकडून २५ लाखांची देणगी भाजपाला मिळाली आहे. दरम्यान हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (५ लाख), राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखर ( २ कोटी), अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू (१.१ कोटी) किरण खेर (६.८ लाख), मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे संचालक टी. व्ही. मोहनदास (१५ लाख) यांचा देखील भाजपाच्या देणगीदारांमध्ये समावेश आहे.

टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार  देणगीदारांची ही नावं आणि रक्कम ही फक्त ज्यांनी २० हजारांहून जास्त देणगी दिली त्यांचीच आहेत. त्याखालची रक्कम देणाऱ्या देणगीदारांची रक्कम यात समाविष्ट केल्यास हा आकडा ७५० कोटींपेक्षा जास्त होऊ शकतो. तसेच, पक्षाच्या इलेक्टोरल बॉण्ड्समधून मिळणारे  उत्पन्न अद्याप निवडणूक आयोगाकडे सादर झालेले  नसल्यामुळे ती रक्कमही यामध्ये भर घालू शकते. या रकमेचं ऑडिट निवडणूक आयोगाला सादर करण्याची मुदर ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!