Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : महाराष्ट्राबाहेर चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली ,परमबीरवीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी आपल्या विरोधातील प्रकरणांची चौकशी करावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने, तुम्ही ३० वर्षे पोलीस दलात काम करत आहात. मात्र आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहात. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात, तरीही तुम्हाला तुमच्या राज्यावर किंवा तिथल्या प्रशासनाच्या चौकशीवर विश्वास नाही का? असा प्रश्न विचारत याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान हि याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली आहे.

या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी “जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते” असे ताशेरे परमबीर सिंह यांच्यावर ओढले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ट लावल्याचा दावा परमबीर सिंह यांनी केला होता . परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका फेटाळताना म्हटले की, “तुम्ही महाराष्ट्र केडरचे ज्येष्ठ पोलीस अधिकारी आहात. सुमारे ३० वर्षे तुम्ही महाराष्ट्र केडरमध्ये सेवा केली आहे. तरीही तुम्ही राज्य सरकारच्या आणि पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसल्याचे आता सांगत आहात? हे अतिशय धक्कादायक आहे”. यावेळी बोलताना सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनाही न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी सुनावले . ते म्हणाले, पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाब टाकला जात असेल तर कोणत्याही दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाब टाकला जाऊ शकतो. विनाकारण काहीही गोष्टी सांगू नका.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!