AurangabadNewsUpdate : ट्रॅक्टर चोरांची टोळी अटकेत,१३लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद- दोन आठवड्यांपूर्वी पिशोर आणि करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी ग्रामीण गुन्हे शाखेने जेरबंद केली. या टोळीत दोन रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून १२लाख ८०हजारांचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.आरोपींना पुढील तपासासाठी पिशोर आणि कन्नड पोलिसांच्या हवाली केले आहे.
शेख समीर शेखरज्जाक(२८) गजानन शंकर तुपे(३६) अमोल खमाट, (२५)ज्ञानेश्वर धांडे(२४) सर्व रा.फुलंब्री तालुका यातील शेख समीर व गजानन तुपे हे रेकाॅर्डवरचे गुन्हेगार आहेत. समीर नशीर पठाण(३६) व कलीम सलीम बेग अशी अटक आरोपींची नावे आहेत. समीर पठाण आणि कलीम बेग दोघांकडे वरील चार आरोपींनी पिशोर आणि करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेले दोन ट्रॅक्टर विक्रीसाठी दिले.अशी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी पथकासह फुलंब्री आणि वैजापूर तालुक्यातून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आला.
वरील कारवाई पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक फुंदे,पीएसआय गणेश राऊत, पोलिस कर्मचारी संजय काळे, बाळू पाथ्रीकर,विक्रम देशमुख, बाबासाहेब नवले, योगेश तरमाळे यांनी सहभाग घेतला होता.