IndiaNewsUpdate : 39 बायकांचा दादला आणि त्याचा 181 लोकांचा परिवार कोरोनाकाळात कसा आहे ?

मुंबई : केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा परिवार म्हणून ख्याती असलेल्या भारतातील मिझोरम येथील चाना परिवाराची उपजीविका कोरोना काळात कशी चालू आहे याचा शोध माध्यमांनी घेतला तेंव्हा कुटुंब प्रमुख जिओना चाना यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सर्व काही ठीक चालू असल्याचे सांगितले आहे .
जिओना चाना यांची या त्यांच्या भव्य -दिव्य परिवारामुळे जगभरात ओळख आहे . त्याचे कारण असे आहे कि , त्यांना तब्बल ३९ बायका आहेत. या बायकांपासून चाना यांना तब्बल ९४ आपत्य आहेत. टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत असल्यामुळे सध्या व्यवसाय आणि नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. लॉकडाऊनचा परिणाम चाना परिवारावरसुद्धा झालाय. याच पार्श्वभूमीवर जिओना चाना आपल्या परिवारातील १८१ सदस्यांना कसे सांभाळतात या विषयी लोकांना मोठी उत्सुकता आहे.
चाना यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा परिवार हा जगातील सर्वात मोठा परिवार असल्यामुळे या परिवाराला जगभरातून देणगी मिळते. याच कारणामुळे चाना परिवाराला सध्याच्या कोरोनास्थितीमध्ये सध्या तरी कोणतीही आर्थिक अडचण नाही. खर्च वाचावा म्हणून चाना फॅमिली घरातील अंगनातच पालक, मिर्ची, ब्रोकली अशा प्रकारच्या फळभाज्या पिकवतात. होम गार्डनिंग केल्यामुळे या परिवाराचा सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बराच खर्च वाचत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या घरातील पुरुष मंडळी शेती तसेच पशुपालनाच्या माध्यमातून पैसे कमवायचे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे इतरांप्रमाणे त्यांचे रोजगारही धोक्यात आले आहेत. तसेच परिवारातील पुरुष हे फळभाज्या तसेच कुक्कुटपालनही करायचे मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचा हा पर्यायसुद्धा संपला आहे.
असा आहे त्यांचा आहार !!
जिओना चाना यांनी भारतातील मिझोरम येथील बटवंग गावामध्ये एका १०० खोल्या असलेल्या घरात राहतात. त्यांच्या काही मुलांची लग्नसुद्धा झाली आहेत. चाना यांना १४ सुना आणि ३३ नातवंडे आहेत. या परिवारामधील बहुतांश महिला गृहिणी आहेत. परिवार मोठा असल्यामुळे चाना कुटुंबाचा खर्चसुद्धा चांगलाच मोठा आहे. या कुटुंबाला एका दिवसाला तब्बल १०० किलो डाळ-भात लागतो. हा खर्च फक्त दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाचा आहे. चिकन किंवा मटण खायचे असल्यास या परिवाराला एका वेळी तब्बल ४० किलो मांस लागते. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तसेच नॉनव्हेज तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे हे कुटुंब फळभाज्यांना अधिक पसंती देत आहे.