AurangabadCrimeUpdate : मड्ड्या उर्फ विशाल फाटे खून प्रकरण : उर्वरित चौघांना बेड्या

औरंगाबाद – मड्ड्या उर्फ विशाल फाटे खून प्रकरणात उर्वरित चौघांना वाळूज औद्योगिक पोलिसांनी ओएसिस चौकातून बुधवारी सापळा रचून अटक केली.त्यांना कोर्टाने २९तारखे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक मधूकर सावंत यांनी दिली.
दिपक तुकाराम प्रधान (२९) किरण सुदाम वाघ(२८) राहूल पंढरीनाथ विटैकर(२९) तिघेही रा.वडगाव कोल्हाटी व महेश हिरालाल शिगोटे (२८) रा. कमळापूर फाटा अशी अटक आरोपींची नावे आहेत.यापूर्वी तीन आरोपींना पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी अटक केले आहेत.
२१मे च्या रात्री १०च्या सुमारास मृगनयनी हाॅटेल जवळ प्रधान गॅंगच्या सात जणांनी मड्ड्यावर हल्ला चढवून त्याचा दगडाने ठेचून खून केला होता. या कारवाईत पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस विवेक सराफ, यांनीही सहभाग नोंदवला.पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, प्रशांत पोतदार, पीएसआय प्रशांत गंभीरराव, पोलिस कर्मचारी नवाब शेख,खय्यूम पठाण, विक्रम वाघ यांनी कारवाई पार पाडली