AurangabadCrimeUpdate : पोलिसांच्या हाताचा चावा घेऊन मारण्यासाठी हेल्मेट उगारणाऱ्या माजी सैनिकांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद – लेन कट प्रकरणी वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्यामुळे संतापलेल्या माजी सैनिकाने कर्तव्यावर असलेल्या पीएसआय आणि कर्मचार्यांवर हेल्मेट उगारत चावा घेतला. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी माजीसैनिकाला गजाआड केले आहे. भगवान कृष्णा सानप(५५) राजयश्री काॅलनी मुकुंदवाडी असे अटक आरोपीचे नाव आहे.
आज दुपारी १२च्या सुमारास महावीर चौकात वाहतूक नियमाचा भंग केल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड व पोलिस कर्मचारी माळी यांनी सानपला विचारणा केली.पण माजीसैनिक उध्दट वागू लागल्यामुळे त्याच्याशी वाद न घालता १ हजार २००रु.ची पावती त्याला मोबाईलवर पाठवली. दरम्यान आरोपी तो पर्यंत वाळूज ला पोहोचला होता तेंव्हा दंडाचा मेसेज मोबाईलवर येताच …. परत आला व पीएसआय बनसोड यांच्यावर हेल्मेट उगारले. म्हणून त्याला आवरत असतांना आरोपीने बनसोड व माळी यांच्या हाताला चावा घेतला.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भदरगे करंत आहेत.