Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

West Bengal Assembly Election 2021 Results Live : पश्चिम बंगाल ममतांच्याच मागे

Spread the love

कोलकाता : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला मात देत  पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.  राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झाले आहे. या निकालात २४९ जागांच्या विधानसभेत १४७ चा मॅजिक फिगर  पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच गाठत असल्याचे चित्र आहे.

गेल्या १० वर्षांपासून ममता बॅनर्जी  सत्तेत असून पश्चिम बंगालमधील निकालाच्या कौलानुसार जनतेने  पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. दरम्यान या निवडणुकीत  ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे  आव्हान निर्माण केले  होते.  स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केल्यामुळे  ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी हि निवडणूक अत्यंत अवहनात्मक झाली होती.

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना धक्का

पश्चिम बंगालच्या जनतेचा कौल ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आला असला तरी नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना भाजपाचे सुवेंदू अधिकारी कडवी झुंज द्यावी लागत आहे. चौथ्या फेरीअखेर ममता बॅनर्जी सात हजार मतांनी पिछाडीवर असून सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. एकीकडे राज्यात तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता असताना दुसरीकडे मात्र ममता बॅनर्जी यांच्यावर पराभवाचे सावट आहे.

तृणमूल काँग्रेसने तब्बल 189 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागणारा 147 चा आकडा तृणमूल काँग्रेसने सहज पार केला आहे. तर भाजपने 89 जागांवर आघाडी घेतली आहे.

तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये द्रमुकने  106 तर अण्णा द्रमुक 86 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप या ठिकाणी 5 जागांवर आघाडीवर आहे.

केरळ : भाजपा पुन्हा एकदा निष्प्रभ

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 140 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. निकालाचा पहिला कल हाती आला असून लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटने इथं मोठी आघाडी घेत सत्तेकडे कूच केली आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन, आरोग्य मंत्री के.के. शैलजा, काँग्रेसचे नेते ओमेन चंडी आणि रमेश छेन्नीथाला हे महत्त्वाचे नेते सध्या आघाडीवर आहेत.

केरळमध्ये भाजपा पुन्हा एकदा निष्प्रभ ठरताना दिसत आहे. केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन दोन जागांवर निवडणूक  लढवत आहेत. निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचा दावा त्यांनी केला होता. कोन्नी आणि मांजेश्वर या मतदारसंघातून सुरेंद्रन हे निवडणूक लढवत असून, दोन्ही जागांवर पिछाडीवर आहेत. कोन्नी मतदारसंघात ते तिसऱ्या स्थानी आहे, तर मांजेश्वर मतदारसंघात दुसऱ्या स्थानी आहेत.

आसाम

आसाममध्ये सध्या भाजपाची सत्ता असून, पुन्हा एकदा मतदारांनी भाजपाला पाठिंबा दिल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीच्या काही फेऱ्यांमधून दिसून येत आहे. १२६ जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ८२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४३ जागांवर पुढे आहे. आसाममध्ये बहुमताचा आकडा ६४ आहे.

पुदुचेरीत भाजपा आघाडीवर

अल्पमतात आल्यानंतर सरकार कोसळेल्या पुदुचेरीत पुन्हा काँग्रेस वापसी करणार का याकडेही लक्ष होतं. मात्र, पुदुचेरीत भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेसने फक्त तीन जागांवर आघाडी घेतली आहे. ३० जागा असलेल्या पुदुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा १६ आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!