AurangabadNewsUpdate : मेहबुब शेख प्रकरण : खंडपीठाचे पोलिसांवर ताशेरे

पोलिस आयुक्तांनी सहाय्यक पोलिस आयुक्तांना तपासाचे धडे देणे गरजेचे
औरंगाबाद – पोलिसआयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना महिलासंदर्भातील गुन्ह्यांचा तपास कसा करावा याचे धडे देणे गरजेचे आहे.असे ताशेरे न्या. रविंद्र घुगे आणि न्या. बी.यू. देबडवार यांच्या खंडपीठाने औरंगाबाद पोलिसांवर ओढले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मेहबूब शेख यांना बलात्कार प्रकरणात अटक करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्यामुळे पिडीत महिलेने खंडपीठात २६ डिसें २० रोजी धाव घेतली होती.
दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीपी निशीकांत भुजबळ यांनी आरोपीला अटक का केली नाही ? अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे.आरोपीच्या म्हणण्यानुसार गुन्हा घडला त्यावेळी आरोपी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबंत होता. ज्या मध्ये माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांचा उल्लेख होता. त्यांच्या नावांचा उल्लेख पोलिसांनी टाळला.
दरम्यान तपास अधिकारी आश्लेषा पाटील यांच्याकडून तपास का काढून घेतला याबाबत पोलिसांना कोणतेही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.गृहमंत्रालयाच्या महिला सुरक्षा विभागाच्या नियमानुसार हा तपास दोन महिन्यात पूर्ण व्हायला हवा होता. तसेच आरोपीस अटक न करता पोलिसांनी बी समरी रिपोर्ट दाखल केल्याचे खंडपीठाने ओढलेल्या ताशेर्यात म्हटले आहे.या प्रकरणी पिडीते तर्फे जेष्ठ विधिज्ञ अॅ.राजेंद्र देशमुख, अॅड.केतन पाटे, अॅड. अभिजित आव्हाड यांनी काम पाहिले.