Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraNewsUpdate : राज्यात नवे रुग्ण ६० हजाराच्या घरात , ३२२ मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल ३२२ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५६ हजार ६५२ वर गेला आहे. त्यासोबतच वाढते करोनाबाधित ही देखील आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५९ हजार ९०७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये राज्यात आज ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही दिलासादायक बाब ठरली आहे.

Advertisements

राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत राज्यात ३१ लाख ७३ हजार २६१ करोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख १ हजार ५५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी, २१ हजार २१२ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मृतांचा आकडा वाढला असला, तरी एकूण करोनाबाधितांची संख्या देखील वेगाने वाढत असल्यामुळे राज्याचा मृत्यू दर अजूनही १.७९ टक्के इतका कमीच असल्याची नोंद झाली आहे.

Advertisements
Advertisements

मुंबईत १० हजार ४२८ नवे रुग्ण सापडले!

दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात १० हजार ४२८ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यासोबतच ६ हजार ७ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी देखील परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या एकूण मृतांचा आकडा ११ हजार ८५१ इतका झाला आहे. तर एकूण करोनाबाधितांची संख्या ४ लाख ८२ हजार ७६० इतकी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!