MaharashtraNewsUpdate : यंदाच्या “भीम जयंती” विषयी प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली भूमिका

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थती लक्षात घेता या पार्श्वभूमीवर आलेली भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील आंबेडकरी जनतेला यंदाची १४ एप्रिल राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे करावी असे आवाहन केले आहे.
यासंदर्भात आंबेडकर यांनी म्हटले आहे कि , कोरोना संक्रमण वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोमवारपासून यासंबंधीचे आदेश लागू झाले असून, ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी हे आवाहन एका ट्विटद्वारे केले आहे.
महाराष्ट्र शासनाने पुन्हा लॉकडाऊन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते, त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा. pic.twitter.com/ULCuJjiljR
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 5, 2021
आपल्या व्हिडीओ ट्विटमध्ये त्यांनी आवाहन केले आहे कि , महाराष्ट्र शासनानं पुन्हा लॉकडाउन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल, असे सांगण्यात येत आहे. तेव्हा संपूर्ण जनतेला माझे आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा.
दरम्यान मागील वर्षीही राज्यात कोरोनाचे थैमान सुरू होते . त्यामुळे राज्यातील जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी केली होती. यावर्षीही तीच परिस्थिती असल्याने यंदाची भीम जयंती साजरी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे .त्यामुळे आता सरकार बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याबद्दल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे च लक्ष लागले आहे.