CoronaMaharashtraUpdate : धक्कादायक : 249 कोरोना बळींची नोंद; दिवसभरात 43 हजार 183 नवे रुग्ण

मुंबई : राज्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत असून गेल्या २४ तासात राज्यात ४३ हजार १८३ नवीन करोनाबाधित वाढले असून, २४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील मृत्यू दर १.९२ टक्के आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
तर, आज ३२ हजार ६४१ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.२ टक्के एवढे झाले आहे.
Maharashtra reports 43,183 new COVID-19 cases, 32,641 recoveries, 249 deaths in the last 24 hours
Total cases: 28,56,163
Total recoveries: 24,33,368
Active cases: 3,66,533
Death toll: 54,898 pic.twitter.com/aPpugamW74— ANI (@ANI) April 1, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.